रेड्डींचा सकाळी काँग्रेसला ‘राम-राम’ तर सायंकाळी भाजपला ‘नमस्ते’

आज सकाळीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष डॉक्टर पी सुधाकर रेड्डी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. आता रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले असून यामध्ये त्यांनी पंतप्रधानांसोबत काम करण्याची इच्छा दर्शवली आहे.

या पत्रामध्ये रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंड भरून कौतुक केले असून ते लिहितात, “पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही लवकरच आपल्या पाच वर्षांची अभूतपूर्व कारकीर्द पूर्ण करणार असून आपली कारकीर्द या महान राष्ट्रासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरली आहे. एका सामान्य कुटुंबातून येऊन देखील आपण ही उंची गाठली याबाबत मला आपला सार्थ अभिमान आहे. मला आपल्या नेतृत्वाखाली भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्यास आवडेल.”

दरम्यान आज सकाळी काँग्रेसला राम-राम ठोकताना रेड्डींनी काँग्रेसनेतृत्वावर कडाडून टीका केली होती. काँग्रेसद्वारे लोकसभांचे तिकीट देण्यासाठी उमेदवारांकडून कोट्यवधी रुपये घेतले जात असून सध्याच्या काँग्रेस पक्षाने आपल्या परंपरा गंगाजळी मिळविल्या आहेत असे गंभीर आरोप त्यांनी लावले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)