तोंडाला पाणी… मार्केट यार्डात गुजरात येथून जांभळाची आवक सुरू

नेहमीच्या तुलनेत महिनाभर आधीच आवक : भावही मिळतोय जास्त

पुणे: गोड चवीचे जांभुळ म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा जांभळाची नेहमीच्या तुलनेत यंदा एक महिना आधीच गुजरात येथून आवक सुरू झाली आहे. भावही गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक मिळत आहे. शुक्रवारी मार्केट यार्डातील फळविभागात घाऊक बाजारात प्रती किलो जांभळाला 151 रुपये भाव मिळाला. जो गेल्या वर्षी 120 ते 130 रुपये होता, अशी माहिती व्यपारी पांडुरंग सुपेकर यांनी दिली. हे जांभुळ मधुमेह रोगावर गुणकारी असून, नागरिकांकडून त्याला जास्त मागणी असल्याचे व्यापारी माऊली आंबेकर यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येथील बाजारात बडोदा भागातून शेतकरी इरफान शेख यांच्या शेतातून 20 किलो जांभळाची आवक झाली. याची खरेदी सुबोध झेंडे यांनी केली. याविषयी सुपेकर म्हणाले, दरवर्षी 10 मार्चच्या सुमारास जांभळाची बाजारात आवक सुरू होत असते. मात्र, यावर्षी लवकर झाली आहे. गुजरात येथून येणाऱ्या जांभळाला गर अधिक असते. तुलनेने इतर जांभळापेक्षा हे जाभुळ अधिक गोड, आकाराने मोठे आणि दिसायला आकर्षक असते. त्यामुळे त्याला जास्त मागणी असते. जुन-जुलैपर्यंत या जांभळाची आवक सुरू राहणार आहे.

आणखी अडीच ते तीन महिन्यांनी राज्यातील गावरान आणि कर्नाटक, गोव्यातून जांभळाची सुरू होईल. महाबळेश्‍वर, मान आणि कोकण भागातून गावरान जांभळाची आवक होत असते. कर्नाटक आणि गोव्याचे जांभूळ तुलनेने स्वस्त असल्याने त्यांना प्रक्रिया उद्योगांकडून मागणी असते. आवक वाढल्यानंतर जांभळाच्या भावात आणखी घट होईल, असेही त्यांनी सांगितले. तर आंबेकर म्हणाले, सुरू झालेली गुजरात जांभळाची आवक तुरळक प्रमाणात सुरू राहिल. 10 मार्चनंतर आवक वाढेल. त्यावेळी सुमारे 5 टन आवक होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)