खटाव तालुक्‍यात भाजपाची मुसंडी

वडूज – खटाव तालुक्‍यातील चार ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप प्रणित स्थानिक आघाडीने जोरदार मुसंडी मारली. चार पैकी खटाव, फडतरवाडी, शिरसवडी तीन ग्रामपंचायतीत आघाडीने सरपंच पदासह बहुमत मिळविले तर काळेवाडीत माजी सरपंच विनायकशेठ काळे यांनी करिष्मा कायम ठेवत राष्ट्रवादीचे अस्तित्व कायम राखले. बहुतांशी ठिकाणी मतदारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला “दे धक्का” दिला आहे. बहुचर्चीत खटावमध्ये जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदिप विधाते यांच्या 20 वर्षाच्या सत्तेला सुरूंग लागला आहे.

खटावमध्ये माजी जि. प. सदस्य महेश शिंदे, युवानेते राहूल पाटील यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलने सरपंचपदासह 14 जागा जिंकत निर्वीवादरित्या परिवर्तन घडवले. याठिकाणी सरपंच नंदकुमार वायदंडे यांना 3 हजार 722 मते मिळाली तर सत्ताधारी पिंपळेश्‍वर संघटनेचे उमेदवार विजय बोबडे यांना 2 हजार 845 मते मिळाली.
फडतरवाडी येथे जेष्ठ नेते सतिशराव फडतरे, नवनाथ फडतरे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा आघाडीने सरपंचपदासह 8 जागा जिंकून आपले वर्चस्व कायम राखले. याठिकाणी सरपंचपदी माधवी चंद्रकांत गिरी यांनी 485 मते मिळवून यशोदा राऊत (216 मते) यांचा पराभव केला. याठिकाणी पल्लवी दत्तात्रय फडतरे (156), तानाजी अनिल फडतरे (146), विजया गिरी (176), पुष्पा फडतरे (174), किरणकुमार फडतरे (174), विजया दशरथ गिरी (140), सुरेखा गोरख फडतरे (113) या विजयी झाल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिरसवडी येथे सरपंचपदाच्या उमेदवार रेणूका संतोष कुदळे यांनी 851 मते मिळवून उज्वला हणमंत कुंभार (386) यांचा पराभव केला. याठिकाणी रेवणनाथ नाना इंगळे (246), विद्या प्रमोद इंगळे (375), उल्हास ज्ञानू इंगळे (324), बापू नामदेव कांबळे (269) हे पाच जण विजयी झाले. तर उर्वरीत चार जागांवर शोभा माळी, रूपाली इंगळे, शितल इंगळे, सुमन इंगळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

काळेवाडीत विनायकशेठ काळे यांचा करिष्मा कायम
काळेवाडी ग्रामपंचायतीत माजी सरपंच विनायकशेठ बाबुराव काळे यांनी आपला करिष्मा कायम ठेवत सरपंचपदाला दुसऱ्यांदा गवसणी घातली. त्यांना 132 मते मिळाली. त्यांचे प्र तिस्पर्धी विजय काळे यांना 81 मतांवर समाधान मानावे लागले. छबुताई प्रल्हाद काळे (42), ऋतुजा संतोष काळे (43), विजय काळे (47), निर्मला दत्तात्रय काळे (47), ज्ञानदेव राजाराम काळे (48) हे विजयी झाले. सलग तीन टर्म सत्ता राखत विनायकशेठनी हॅटट्रीक साधण्याबरोबर राष्ट्रवादीची प्रतिष्ठा कायम ठेवली.
परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार व कंसात त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : वार्ड 1 – दिपक बाजीराव घाडगे (480), वार्ड क्रमांक 2 – राहूल सुभाष जमदाडे (564), उत्तम महादेव बोर्गे (606), न सिमबानू मुसा काझी (526), वार्ड क्रमांक 4 – महेश उत्तमराव घाडगे (876), मनिषा विलास कुंभार (847), रेश्‍मा दत्तात्रय लावंड (834), वार्ड क्रमांक 5 – अमर वामन देशमुख (728), शबाना तैमुर मुल्ला (635), कांचन रमेश शिंदे (649), वार्ड क्रमांक 6 – प्रदिपकुमार अनंत सावंत (659), माधवी रविंद्र सकटे (628), सुरेखा अर्जुन पाटोळे (679), तर सत्ताधारी पिंपळेश्‍वर पॅनेलला वार्ड क्रमांक 3 मधील युवराज हणमंत शिंदे (560), वैभव धनंजय वाघ (590), अनिसा अनिझ झारी (606) तसेच वार्ड क्रमांक 1 मधील अपर्णा गणपत घाडगे (430) या चार जागेवर समाधान मानावे लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)