आरक्षण आंदोलनाची धग जिल्हापरिषदेत

सदस्यांनी मांडला ठिय्या: सर्वसाधारण सभेत ठराव 
सातारा- मराठा आरक्षण मागणी आंदोलनाचे पडसाद शुक्रवारी जिल्हापरिषदेत उमटले. सर्वसाधारण सभेच्या अगोदर जिल्हापरिषद सदस्यांनी सभागृहाच्या बाहेर ठिय्या मांडला तर सर्वसाधारण सभेत मराठा,धनगर व मुस्लिम आरक्षणाचा ठराव करण्यात आला. सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावना व ठराव शासनाला पाठविणार असल्याचे जिल्हापरिषद अध्यक्ष संजीवराजे ना.निंबाळकर यांनी सांगितल्यानंतर सभेचा समारोप करण्यात आला.
शुक्रवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन छ.शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आले होते. दरम्यान, गुरूवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन झाल्याचे पडसाद आपसुकच जिल्हापरिषदेत उमटले. सभेच्या अगोदर जिल्हा परिषद सदस्य प्रा.डॉ.शिवाजीराव चव्हाण, मानसिंगराव साळुंखे, निवास थोरात, मनोज पवार, मंगेश धुमाळ, सोनाली पोळ, प्रतिक कदम, अभय तावरे, रेश्‍मा भोसले आदी.सदस्य व पंचायत समिती सभापतींनी सभागृहाच्या प्रवेशव्दारासमोरच ठीय्या आंदोलन केले.
तसेच मराठा, धनगर, मुस्लिम समजाला आरक्षण हे मिळालेच पाहिजे घोषणा देवून जिल्हापरिषद दणाणून सोडली. यानंतर काही वेळातच जिल्हापरिषद अध्यक्ष संजीवराजे ना.निंबाळकर व पदाधिकारी त्या ठीकाणी आले. त्यांनी सर्वसाधारण सभेत आपल्या मागणीचा ठराव मंजूर करून शासनाला पाठविण्यात येईल असे सांगितल्यानंतर सभेच्या कामकाजाला सुरूवात झाली. सभेदरम्यान, मानसिंगराव जगदाळे, धैर्यशील अनपट, मंगेश धुमाळ यांच्यासह सदस्यांनी मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षणचा ठराव मांडला व तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)