इतिहासात शिवाजी महाराजांसारखा रयतेचा राजा सापडणे मुश्कील : नरेंद्र मोदी

”रयतेचा राजा, शेतकऱ्यांचे कैवारी व छत्रपती पदवी असलेले एकमेव महापुरुष म्हणून शिवाजी महाराजांची कीर्ती जगात आहे. महाराष्ट्राच्या कडेकपारीत ज्यांच्या नावाचा अखंड गजर होतो अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर छत्रपती शिवाजी महाराज विनम्र अभिवादन केले आहे. ट्विटरवर मोदींनी व्हिडिओ पोस्ट करत महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले आहे. या ट्विटमध्ये मोदींनी लिहिले आहे कि, ” छत्रपती शिवाजी महाराज हे सत्य आणि न्यायासाठी लढणारे आदर्श राजे होते. ते खरे देशभक्त होते. समाजातील सर्वच स्तरातील लोकांना ते आपले राजे वाटत म्हणूनच त्यांना रयतेचा राजा म्हणतात. तसेच जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे मुश्कील आहे.  जय शिवराय.’  तसेच शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)