‘आयएनएस शिवाजी’चा इतिहास आता दृश्‍य स्वरुपात

“प्लॅटिनम ज्युबली’ : संकेस्थळावर चित्रफित उपलब्ध

पुणे  – नौदलाचे महत्त्वाचे प्रशिक्षण केंद्र असणारे लोणावळा येथील “आयएनएस शिवाजी’ यंदा आपले 75वे वर्ष साजरे करत आहे. “आयएनएस शिवाजी’च्या “प्लॅटिनम ज्युबली’चे औचित्य साधून केंद्रातर्फे “आयएनएस शिवाजी’चा इतिहास सांगणारी चित्रफित सादर करण्यात आली आहे. संस्थेच्या संकेस्थळावर ही चित्रफित नागरिकांना पाहता येणार आहे.

नौदलप्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांच्या हस्ते “आयएनएस शिवाजी’च्या https://www.indiannavy.nic./in या संकेतस्थळाचे उद्‌घाटन सोमवारी झाले. संस्थेच्या कार्याबद्दलची माहिती, येथील उपक्रम, अभ्यासक्रम आणि संस्थेच्या कामाकाजाबाबतची माहिती या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. त्याचबरोबर यंदाच्या “प्लॅटिनम ज्युबली’चे औचित्य साधत “आयएनएस शिवाजी’चा इतिहास सांगणारी एक विशेष चित्रफितही या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

या चित्रफितीमध्ये 1945पूर्वीचा “आयएनएस’वरील प्रशिक्षण तसेच त्यानंतरची “आयएनएस शिवाजी’ची घौडदौड याबाबत माहिती देण्यात आली आहे. या चित्रफितीच्या माध्यमातून नागरिकांना “आयएनएस’चा इतिहास दृष्य स्वरूपात पाहण्याची संधी मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)