पाच आठवड्‌यात सहा आमदारांची कॉंग्रेसचा हात सोडून भाजपाला साथ 

नवी दिल्ली – गेल्या पाच आठवड्‌यात सहा आमदारांनी कॉंग्रेसचा हात सोडून भाजपाला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात 4 राज्यांतील 7 आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला असून सातपैकी सहा आमदार कॉंग्रेसचे आणि एक तृणमूल कॉंग्रेसचा असल्याचे सांगण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने प्रतिपक्षांत खिंडारे पाडण्यास धडाक्‍याने सुरुवात केली आहे. सहा आमदार फुटणे हा कॉंग्रेससाठी मोठा धक्का आहे.

राज्यवार पक्षांतरे – 
1. पश्‍चिम बंगाल : पक्षातून हकालपट्टी केलेले खासदार अनुपम हजारा, आमदार दुलार चंद (कॉंग्रेस), खगेन मुर्गू (माकपा) मंगळवारी भाजपात दाखल झाले.

-Ads-

2. महाराष्ट्र : विधानसभा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील भाजपात आले. त्यांचे नाव लोकसभा उमेदवारीसाठी सुचवल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांना अहमदनगरमधून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

3. गुजरात : गेल्या पाच आठवड्यात वल्लभ धारवीया, जवाहर चावडा, पुरुषोत्तम सपारिया आणि आशा पटेल हे चार आमदार कॉंग्रेस सोडून भाजपात सामील झाले आहेत.

4. कर्नाटक : आमदार उमेश जाधव कॉंग्रेस सोडून भाजपात आलेले लोकसभेसाठी कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खडगे यांना गुलबर्ग्यात टक्कर देणार आहेत. मल्लिकार्जुन खडगे यांच्या मुलाला-प्रियंकला राज्यमंत्रिमंडळात मंत्रिपद दिल्याने उमेश जाधव नाराज झालेले आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)