महापालिका रणसंग्राम २०१८: भाजपच्या पहिल्या यादीत  विद्यमान 10 नगरसेवकांना तिकिट 

प्रदेशाध्यक्ष दानवे व पालकमंत्री शिंदे यांच्याकडून 15 जणांची यादी जाहीर 

नगर: भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेच्या नगरसेवकांना या यादीत स्थान मिळाली आहे. या यादीत भारतीय जनता पक्षाच्या सहा नगरसेवकांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाने जेवढा गाजावाजा करत घेतलेल्या मुलाखतींच्या पार्श्‍वभूमीवर ही यादी प्रभावी नसल्याचे बोलले जात आहे. परंतु पक्षातील ज्येष्ठांनी ही यादी जाहीर करताना कोअर कमिटीनं खूप सावधानता बाळगली असल्याचे सांगितले आहे. ही यादी म्हणजे, भाजपने चाचपटत टाकलेले पहिले पाऊल आहे. यानंतरच्या यादीत विरोधकांवर आणखी बॉम्ब पडतील, असाही दावा पक्षाने केला आहे.

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत ही यादी जाहीर झाली आहे. या यादीत विद्यमान 10 नगरसेवक आहेत. भारतीय जनता पक्षाचे सहा व इतर पक्षातून आलेले चार नगरसेवक आहेत. शारदा दिंगबर ढवण, अशोक नाथाजी कानडे, महेश रघुनाथ तवले, उषा शिवाजीराव नलावडे, मनोज लक्ष्मण दुलम, सोनाबाई तायगा शिंदे, महेंद्र मोहिनीराज गंधे, आशा शिवाजीराव कराळे, बाबासाहेब सोन्याबापू वाकळे, सुनीता किसनराव भिंगारदिवे, मालन सुरेश ढोणे, नंदा मनेष साठे, सुवेंद्र दिलीप गांधी, शैलेश सुरेश मुनोत व किशोर आसाराम डागवाले या 15 जणांना भाजपने उमेदवारी दिली आहे. भारतीय जनता पक्ष महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवेल, अशी घोषणा शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी केली आहे. 68 जागांवर उमेदवार देण्यासाठी कोअर कमिटीने मुलाखती घेतल्या होत्या. सुमारे 267 जणांनी मुलाखती दिल्या आहेत. या मुलाखतीनंतरच कोअर कमिटीने यादी निश्‍चित करण्यास सुरूवात केली आहे.

युतीच्या अपेक्षा धुसरच… 

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीचा पेच कायम आहे. त्यावरून उमेदवारीचा पेच निर्माण झाल्याचे दिसते. शिवसेना व भाजपचे स्थानिक ज्येष्ठ नेते सोडल्यास इतर पदाधिकारी अजूनही युतीच्या प्रतीक्षेत आहेत. भाजपने जाहीर केलेली 15 जणांच्या यादीत, प्रभाग पाचचे चारही उमेदवार जाहीर केले आहेत. प्रभाग तीन, चार व केडगावमधील 16 आणि 17 च्या उमेदवारांची नावे भाजपच्या यादीत नाहीत. भाजपकडून प्रभाग 1 मधून शारदा ढवण व अशोक कानडे, प्रभाग 2 मधून महेश तवले व उषा नलावडे, प्रभाग 5 मधून मनोज दुल्लम, सोनाबाई शिंदे, महेंद्र गंधे व छाया कराळे, प्रभाग 6 मधून स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे, प्रभाग 7 मधून सुनीता भिंगारदिवे, प्रभाग 9 मधून मालन ढोणे, प्रभाग 11 मधून नंदा साठे आणि सुवेंद्र गांधी, प्रभाग 12 मधून शैलेश मुनोत, प्रभाग 13 मधून किशोर डागवाले यांची उमेदवारी आज जाहीर करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
2 :heart:
2 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)