जिल्ह्यात “स्मार्ट पोलीस जिल्हा’ राबवणार

ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील : बारामती येथे शांतात कमिटीची बैठक
बारामती – पोलीस खात्यातील पायाभूत सुविधा, तपास तसेच लोकांशी असलेले वर्तन आदी बाबींमध्ये सुसुत्रता व गतिमानता आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या संकल्पनेनुसार “स्मार्ट पोलीस जिल्हा’ ही संकल्पना पुणे जिल्ह्यात राबवणार असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

बारामती येथे गणेशोत्सव, ईद तसेच गोकूळ आष्टमी आदी सणांच्या पर्श्‍वभूमिवर शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन चिराग गार्डन येथे करण्यात आले होते, त्यावेळी संदीप पाटील बोलत होते. यावेळी तहसीलदार हनुमंत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, मुख्याधिकारी योगेश कडूसकर, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, विठ्ठल दबडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

संदीप पाटील म्हणाले की, स्मार्ट पोलीस संकल्पनेमुळे पोलीस खात्याला गतिमानता येणार आहे. स्मार्ट पोलीस संकल्पना राबविल्यास पोलीस खात्याच्या कामगिरीमध्ये अमुलाग्र बदल घडण्यास मदत होणार आहे. त्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग तसेच पोलीस ठाण्यात कमी असलेल्या सुविधांची पुर्तता करावी लागणार आहे. स्मार्ट पोलीस जिल्हा करण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे. त्यानंतरच्या पडतळाणीनंतर अशा प्रकाराचा दर्जा प्राप्त होऊ शकतो. पोलिसांची नागरिकांशी असलेली वागणूक ही स्मार्ट पोलीस संकल्पनेच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

शांतता कमिटीची बैठक ही प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवादाचे माध्यम आहे. संवादतून अनेक प्रश्‍न मार्गी लागतात. केवळ डीजे तालावर मिरवणुका काढणे ही विकृती आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात प्रत्येक घरातील महिलांना सहभागी होता येईल, अशा मिरवणुकांचे आयोजन करणे गरजे आहे. तरुणांनी याबाबत पुढाकार घ्यावा, तसेच डॉल्बीमुक्‍त मिरवणूक साजरी करावी, असे अवाहन पाटील यांनी यावेळी केले. पोलीस मित्रांच्या माध्यमातून महाविद्यालयीन तरुणांना मदतीस घ्यावे तसेच त्यांना ओळखपत्र, प्रमाणपत्र देण्यात यावे जेणेकरुन भविष्यात त्याचा त्यांना फायदा होईल, अशा सूचना पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी शांतता कामिटीच्या सदस्यांकदून आलेल्या सुचनांची दखल त्यांनी घेतली.

 कोणाचे सकार आले तरी गुन्हे कायम राहतात
परिणामांची जाणीव नसल्याने आंदोलना दरम्यान तरुण हातात कायदा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यावर वेगवेळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होतात. आमचे सरकार आल्यावर गुन्हे मागे घेऊ असे सांगितले जाते. मात्र, कायद्याच्या चाकोरीत राहून पोलीस यंत्रणा कार्यरत असते, असे गुन्हे माघारी घेता येत नाहिती. एकवेळ नेत्यांचे गुन्हे मागे घेतले जातता मात्र कार्यकर्त्यांचे गुन्हे तसेच राहतात. हा विनोदाचा भाग असला तरी सरकार कोणाचेही आले तरी गुन्हे कायम राहतात याची तरुणांनी दखल घ्यावी.
 ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून काम होणे गरजेचे
दिवसेंदिवस शहरिकरण व नागरिकरण वाढत आहे. त्यामाने पोलिसांचे संख्याबळ कमी पडत आहे. ग्रामीण भागात ग्राम सुरक्षादल महत्त्वाचे आहे. गावातील तरुणांचा सहभाग वाढवून गावपातळीवर ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून काम होणे गरजेचे आहे. याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. ग्रामसुरक्षा दलामध्ये महिलांचा समावेश देखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्यासाठी महिला सुरक्षा समिती गठीत करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)