माओवादी संबंध प्रकरणात दुसरे दोषारोपपत्र दाखल !

पाच आरोपींचा समावेश, 1 हजार 837 पाने

पुणे: माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून तपास सुरू असलेल्या आरोपींच्या विरोधात गुरुवारी 1 हजार 837 पानांचे पुरवणी दोषारोपपत्र विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेले आरोपी सुधा भारद्वाज, वरवरा राव, अरुण फरेरा आणि व्हर्णण गोन्साल्विस यांच्यासह फरार आरोपी गणपती यांच्या विरोधातील हे दोषारोपपत्र आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रकरणात दाखल झालेले हे दुसरे दोषारोपपत्र आहे. या पूर्वी सुधीर ढवळे, रोना विल्सन, प्रा. शोमा सेन, महेश राऊत, ऍड. सुरेंद्र गडलिंग आणि भूमिगत असलेले कॉ. एम ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे, किशनदा ऊर्फ प्रशांत बोस, प्रकाश ऊर्फ नवीन ऊर्फ रितुपण गोस्वामी, कॉ. दिपु आणि कॉ. मंगलु अशा दहा जणांविरोधात नोव्हेबर 2018 मध्ये 5 हजार 160 पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)