काश्‍मीरात जवानांच्या ताफ्याजवळ कारमध्ये स्फोट

सीआरपीएफच्या जवानांवर पुन्हा पुलवामासारखा हल्ला

श्रीनगर – जम्मू काश्‍मीरमध्ये सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलीस दल) जवानांच्या ताफ्याजवळ आज (शनिवारी) एका कारमध्ये स्फोट झाला आहे. बनिहाल येथे श्रीनगर-जम्मू महामार्गावरुन सीआरपीएफचा ताफा जात होता. त्यावेळी या ताफ्याजवळच एका कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.

जम्मू काश्‍मीरमधील बनिहाल परिसरातून आज दुपारी सीआरपीएफचा ताफा जात असताना महामार्गावर एक कार उभी होती. या ताफ्यात सीआरपीएफची आठ ते नऊ वाहने होती. या ताफ्यात जवळपास 40 जवान प्रवास करत होती. ज्यावेळी सीआरपीएफचा ताफा कारच्या बाजूने गेला तेव्हा कारमध्ये ठेवलेल्या सिलेंडरचा स्फोट झाला आणि कार पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली. या स्फोटाचा धक्का सीआरपीएफच्या एका वाहनाली पोहोचला. पण ताफ्यातले सर्व जवान सुरक्षित आहे. दरम्यान कारमध्ये स्फोट होताच जवळच उभा असलेल्या चालकाने पळ काढला.

प्रथमदर्शनी कारमध्ये झालेला हा स्फोट सिलेंडर स्फोट असल्याचे सीआरपीएफ सुत्रांनी म्हटले आहे. स्फोट झाला तेव्हा सीआरपीएफचा ताफा फार जवळच्या अंतरावर होता. हा हल्ला असावा असे वाटत नाही. सध्या सर्व बाजूंनी तपास सुरु आहे. या स्फोटानंतर लष्कराने अधिक तपासाला सुरूवात केली आहे.

दरम्यान, जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा दहशतवाद्यांनी हल्ल्यानंतर पुन्हा अशीच दुर्घटना घडल्याने जवानांच्या सुरक्षिततेवर प्रश्‍न निर्माण झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)