बॅडमिंटन स्पर्धेत कश्‍यपला उपविजेतेपद

कलगरी – भारताच्या पारूपल्ली कश्‍यपला कॅनेडियन बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. चीनच्या लीशिंग फेंग याने त्याचा 20-22, 21-14, 21-17 असा पराभव केला.

कश्‍यपने या लढतीत चिवट खेळ केला. पहिल्या गेममध्ये त्याने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्‍यांचा सुरेख खेळ केला. ही गेम घेत त्याने अपेक्षा उंचावली होती. तथापि त्याला नंतरच्या दोन्ही गेम्समध्ये महत्त्वाच्या क्षणी परतीच्या फटक्‍यांवर नियंत्रण ठेवता आले नाही. फेंगने या दोन्ही गेम्समध्ये ड्रॉपशॉट्‌सचा बहारदार खेळ केला. तसेच त्याने प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला.

कश्‍यपने सांगितले की, अंतिम सामन्यात पराभूत झालो असलो तरी माझ्यासाठी उपविजेतेपद ही आगामी करिअरसाठी मनोधैर्य वाढविणारी कामगिरी आहे. या स्पर्धेसाठी मला सहकारी एच.एस.प्रणोयने दिलेल्या सूचना उपयुक्त ठरल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)