शिकार करण्याच्या प्रयत्नात बिबट्या पडला विहिरीत

आळेफाटा – चाळकवाडी (ता. जुन्नर) येथे कुत्र्याची शिकार करण्याच्या प्रयत्नात बिबट्या विहिरीत पडला आहे. ही घटना बुधवारी (दि.१८) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

येथील शेतकरी सहादेवशेठ सोनवणे यांची समाईक विहिर असून आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास इंदूबाई किसन वामन यांना विहिरीत कुत्रे पडले असल्याचे दिसले. यावेळी त्यांच्या सूनबाई आणिता दत्तात्रय वामन यांनी या कुत्र्याला काढण्यासाठी विहिरीत गळ सोडला असता त्यांना विहिरीत बिबट्या असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी हा प्रकार सहादेव सोनवणे यांना सांगितला. याबबत वनखात्याला माहिती मिळाल्यानंतर वनखात्याची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

बिबट्या कुत्र्याची शिकार करत असताना पहिला कुत्रा विहिरीत पडला व त्याचा पाठलाग करताना हा बिबट्या विहिरीत पडला असल्याचा प्राथमिक अंदाज वनखात्याच्या अधिका-यांनी वर्तविला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)