विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांनी मोदींना ‘इंगा’ दाखवला : राहुल गांधी 

जयपूर : राहुल गांधी यांनी ३ राज्यांतील विधानसभा निवडणुकांमधील विजयानंतर आज प्रथमच राजस्थान येथे शेतकरी परिषदेला संबोधित केले. यावेळी बोलताना काँग्रेस अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक शाब्दिक टोले लगावले. ते म्हणाले, “मोदींच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली. यामुळेच तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांनी चांगलाच इंगा दाखवला.”

यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी ‘देशभरातील ज्या-ज्या राज्यामध्ये काँग्रेसचे सरकार येईल त्या-त्या राज्यात शेतकरी कर्जमाफी केली जाईल,’ अशी घोषणा देखील केली. “शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कर्जमाफी हे एक लहान पाऊल असून शेतकऱ्यांचा व्यथा जर खऱ्या अर्थाने सोडवायची असेल तर एक नवी हरित क्रांती देशात घडवून आणावी लागेल.” असे प्रतिपादन देखील त्यांनी यावेळी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)