“वायुसेना’मध्ये इम्रान हाश्‍मी वायुसेना अधिकाऱ्याच्या रोलमध्ये

“जन्नत 2′ आणि “तुम मिले’ सारख्या सिनेमांमधून रोमॅंटिक हिरोचा रोल केलेल्या इम्रान हाश्‍मीने आता आपल्या रोलमध्ये वैविध्य आणायचे ठरवले आहे. आगामी “वायुसेना’ या सिनेमामध्ये तो चक्क वायुदलातील अधिकाऱ्याचा रोल करताना दिसणार आहे. निवृत्त एअर कमोडोर करियादिल चेरियान कुरुविला अर्थात के.सी. कुरुविला यांच्या रोलमध्ये इम्रान आपल्याला बघायला मिळणार आहे.

कुरुविला यांनी 1972 च्या युद्धामध्ये लढाऊ विमानांच्या ताफ्याचे नेतृत्व केले होते. चंदर एअरफिल्ड आणि क्रिस्चियन मंडी इथे त्यांनी लागोपाठ दोन एअर स्ट्राईक केले होते. 1972 च्या भारत-पाक युद्धापासून ते कारगिल युद्धापर्यंतची कुरुविला यांची कारकिर्द या सिनेमामध्ये दखवली जाणार आहे. इम्रानने अशाप्रकारचा रोल यापूर्वी कधीही साकारलेला नाही. त्याला असे रोल आवडतात. या सिनेमाचे शुटिंग खऱ्या हवाई दलाच्या तळावर करण्याचा प्रयत्न आहे. जर खऱ्या लढाऊ विमानाचा वापर शुटिंगमध्ये करण्याची परवानगी मिळाली तर अधिकच उत्तम होईल, असे दिग्दर्शक विजय रत्नाकर गुट्टे यांनी सांगितले.

या सिनेमाचे शुटिंग नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे. याशिवाय जॉन अब्राहमबरोबर “मुंबई सागा’, रुमी जाफरीच्य “चेहरे’ आणि मल्याळम “इजरा’च्या हिंदी रिमेकमध्येही इम्रान काम करतो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)