सिरियात ‘इसिस’चा पराभव दृष्टिपथात 

अमेरिकेकडून कोणत्याही क्षणी विजयी घोषणा अपेक्षित 
दमास्कस – सिरियात इस्लामिक स्टेटच्या (इसिस) दहशतवाद्यांचा पराभव आता जवळ आला आहे. इसिसच्या ताब्यातील अखेरच्या भागात अमेरिका समर्थित सिरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस या कुर्द सेनेने मोहीम सुरू केली आहे. इसिसचे दहशतवादी पूर्व सिरियाच्या दर अल-जोर प्रांतातील बघौज गावात एक किमी परिसरापुरतेच मर्यादित राहिले आहेत. त्यांची नाकेबंदी करण्यात आली आहे. इसिसच्या दहशतवाद्यांनी अजूनही एक हजार लोकांना ताब्यात ठेवले असल्याची माहिती एसडीएफला मिळाली आहे. दहशतवादी या सामान्य नागरिकांना मानवी ढाल म्हणून वापरतात. नागरिकांमध्ये इसिसचे काही म्होरके दडून बसले असण्याचीही शक्‍यता आहे.

तत्पूर्वी शनिवारपर्यंत झालेल्या अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात दहशतवाद्यांची कंबर तोडण्यात आली होती. एसडीएफचे कमांडर जिया फरात यांनी रविवारी सांगितले की, दहशतवाद्यांची नाकेबंदी करण्याबरोबरच सर्व नाके सील करण्यात आले आहेत. एसडीएफचे प्रवक्ता मुस्तफा बाली यांनी सांगितले की, इसिसच्या दहशतवाद्यांचे सर्व रस्ते बंद झाले आहेत. दहशतवादी गुहा, भुयारात दडून बसले आहेत. त्यामुळे त्यांचा खात्मा लवकरच होईल.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)