राजस्थानात भाजपकडून 43 आमदारांचा पत्ता कट 

उमेदवारी नाकारलेल्यांत 4 मंत्र्यांचाही समावेश

नवी दिल्ली  – सरकारविरोधी लाटेचे आव्हान समोर असलेल्या भाजपने राजस्थानात तब्बल 43 आमदारांचा पत्ता कट केला. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारण्यात आलेल्या आमदारांमध्ये 4 मंत्र्यांचाही समावेश आहे.
राजस्थानात 7 डिसेंबरला विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या राज्यातील विधानसभेच्या एकूण 200 जागांपैकी 162 जागांवरील उमेदवार आतापर्यंत सत्तारूढ भाजपने जाहीर केले.

मागील निवडणुकीत भाजपने 163 जागा जिंकल्या होत्या. त्या पक्षाने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये 92 विद्यमान आमदारांचा समावेश आहे. इतर पक्षांमधून दाखल झालेल्या चौघांनाही भाजपने निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्या पक्षाने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये एकाही मुस्लिम नावाचा समावेश नाही. राजस्थानातील मतदार भाजप आणि कॉंग्रेस या पक्षांना आलटून-पालटून सत्ता देत असल्याची आतापर्यंतची परंपरा आहे. त्यातच भाजपला प्रस्थापितविरोधी लाटेचा मुकाबला करावा लागत आहे. त्यामुळे सत्ता राखण्याचे मोठेच आव्हान त्या पक्षापुढे आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)