राजस्थानमध्ये उमेदवारीवरुन कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा 

जयपूर – राजस्थान विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या असतानाच कॉंग्रेसमध्ये उमेदवारी मिळवण्यावरुन मोठा वाद झाला. उमेदवारीसाठी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आज जुंपली आणि त्यांचे समर्थक एकमेकांच्या विरोधात रस्त्यावर उतरले. त्यांना नियंत्रीत करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही ही करावा लागला.

राजस्थानच्या निवाई विधानसभा क्षेत्रात उमेदवारी मिळावी म्हणून प्रशांत बैरवा आणि कमल बैरवा या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला, की दोन्ही कार्यकर्त्यांचे समर्थकच एकमेकांविरोधात थेट कॉंग्रेस कार्यालयासमोर रस्त्यावर उतरले. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी एकमेकाविरोधात घोषणाबाजी केली.त्यांना नियंत्रीत करण्यासाठी शेवटी प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांना मध्यस्थी करावी लागली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दोन्ही कार्यकर्त्यांच्या समर्थकांना नियंत्रीत करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला होता. प्रशांत बैरवा यांनी याच विधानसभा क्षेत्रातून 2013 मध्ये निवडणूक लढवली होती. मात्र, ते अपयशी ठरले होते. तसेच 2008 मध्ये कमल बैरवा यांनी याच विधानसभा क्षेत्रातून निवडणूक जिंकली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)