राजस्थानात 23 मंत्र्यांचा समावेश

जयपुर: राजस्थानात नुकत्याच सत्तेवर आलेल्या अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून आज 23 मंत्र्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. राजभवनावरील कार्यक्रमात या मंत्र्यांना अधिकार पदाची शपथ देण्यात आली. या 23 जणांपैकी 13 कॅबिनेट दर्जाचे तर 10 राज्यमंत्री आहेत.

राज्यपाल कल्याणसिंह यांनी त्यांना शपथ दिली. कॉंग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकदलालाही यात एक मंत्रिपद देण्यात आले आहे. बी.डी. कल्ला, शांतीकुमार धारिवाल, प्रसादीलाल मीना, मास्टर भवंरलाल मेघवाल, लालचंद कटारिया, रघु शर्मा, प्रमोद जैन भाया, विश्‍वेंद्रसिंह, हरिष चौधरी, रमेशचंद मीना, उदयलाल अंजना, प्रतापसिंग खचरीवास आणि सालेह मोहंमद अशी कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांची नावे आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)