पुण्यात होणार युतीच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन

मुख्यमंत्री-उद्धव ठाकरे साधणार संवाद

पुणे – लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांतील दुरावा दूर करण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील युतीच्या कार्यकर्त्यांचे पुण्यात मनोमिलन होणार आहे.

या दोन्ही पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. दि.18 मार्च रोजी ही संयुक्त बैठक होणार असून त्याची जागा आणि वेळ अजून निश्‍चित झालेली नाही.

लोकसभा निवडणुकीसाठी युती होण्याआधी दोन्ही पक्षांमधे सोशल मीडिया तसेच पोस्टर वॉर सुरू होते. याशिवाय, कर्जमाफीसह शासनाच्या इतर निर्णयांवरून शिवसेनेने राज्यभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने तसेच आंदोलने केली. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये विसंवाद निर्माण झाला. मात्र, आता लोकसभेसाठी दोन्ही पक्ष एकत्र लढत असल्याने जागा वाटपानंतर एकमेकांच्या उमेदवारांना युतीचा उमेदवार म्हणून निवडून आणण्यासाठी निवडणुकीचे काम एकत्रित करावे, कशा प्रकारे जनतेपर्यंत पोहचावे, प्रचाराची दिशा कशी असावी, अशा अनेक बाबींबाबत हे दोन्ही नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)