आगामी वर्षात सुरू होणार ‘दबंग 3’ चे शूटिंग 

बाॅलीवूडमधील अभिनेता व निर्माता ‘अरबाज’ खान हा आगामी वर्षात ‘दबंग 3’ सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अरबाज खान निर्मित सिनेमा ‘दबंग’ हा 2010 साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2012 मध्ये दबंग या सिनेमाचा स्क्वीवेल म्हणजेच ‘दबंग 2’ सिनेमा आला. त्यानंतर ‘दबंग 3’ सिनेमा येणार असल्याची चर्चा झाली. मात्र त्यानंतर आता ‘दबंग 3’ सिनेमा येणार असल्याची माहिती खुद ‘अरबाज खान’ याने दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अरबाज खान याने म्हटलं आहे की, ‘आगामी वर्षात ‘दबंग 3’ ची शूटिंग सुरू केली जाणार आहे. ‘दंबग 3’ या सिनेमाच्या स्क्रिप्टचे काम पूर्ण झाले आहे. तसेच सिनेमाची कास्टिंग ही पूर्ण झालेली आहे.  पहिल्यादा हा सिनेमा याच वर्षात फ्लोर्सवर येणार होता मात्र ‘सलमान खान’ इतर सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने असं होऊ शकलं नाही.

माहितीनुसार ‘दबंग 3’ सिनेमात सलमान खान याच्यासोबत अभिनेत्री म्हणून पुन्हा एकदा सोनाक्षी सिन्हा दिसणार आहे. अरबाज खान याने सांगितले की, ‘या सिनेमातील कलाकारांनी ठरवले आहे की, ते एकावेळी एकाच प्रोजेक्टवर काम करणार आहेत, त्यामुळे ‘दबंग 3′ सिनेमाचे शूटिंग लांबणीवर पडले’. ‘दबंग 3’ हा पुढील वर्षाच्या अखेरच्या महिन्यात प्रदर्शित होईल अशी शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)