नेपाळमध्ये सरकारविरोधात पोस्ट टाकल्यास होणार शिक्षा 

काठमांडू – नेपळमध्ये सोशल मिडीयामध्ये पोस्ट करणाऱ्यांना कठोर शिक्षा करणारे विधेयक नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी आणले आहे. मात्र नेपाळी संसदेतील नेपाळी कॉंग्रेसने या विधेयकाला जोरदार विरोध केला आहे. प्रस्तावित विधेयकानुसार सरकारविरोधात सोशल मिडीयामध्ये आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला 15 लाख रुपयंचा दंड आणि किंवा 5 वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुचवण्यात आली आहे. आक्षेपार्ह मजकूर, चारित्र्य मलिन करणारा किंवा राष्ट्रीय सार्वभौमत्वावरील हल्ला ठरू शकणाऱ्या पोस्ट संदर्भात ही शिक्षा लागू असणार आहे.

सरकारने सोशल मिडीयावर वृत्त किंवा संदेश पसरवण्यास गुन्हा ठरवू नये, असे नेपाळी कॉंग्रेसचे नेते आणि माजी माहिती तंत्रज्ञान मंत्री मिनेंद्र रिजाल यांनी म्हटले आहे. या प्रस्तावित विधेयकावरून देशातील कम्युनिस्ट सरकार एकाधिकार -शाहीकडे वाटचाल करत असल्याचे स्पष्ट होत असल्याचेही रिजाल यांनी सांगितले. संसदेमध्ये दोनतृतीयांश बहुमत असूनही नेपाळ कम्युनिस्ट पार्टीचे सरकार प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य हिरावून घेणारे विधेयक आणू शकत नाही, असे ज्येष्ठ विधीज्ञ दिनेश त्रिपाठी यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)