रिअल इस्टेटमध्ये मुंबई महागडे

देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही जगातील सर्वात महागड्या निवासी मालमत्तेच्या बाजारात 16 व्या स्थानावर आहे. नाइट फ्रॅंकच्या द वेल्थ रिपोर्ट 2019 मध्ये जगातील पहिल्या वीस महागड्या शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात महाराष्ट्राची राजधानी मुंबई या एकमेव भारतीय शहराचा समावेश आहे.

अहवालानुसार मुंबईत दहा लाख रुपयांत सुमारे 100 वर्गमीटर जमीन खरेदी करता येते. याचाच अर्थ जमिनीची किंमत 930 डॉलर म्हणजेच 65 हजार 179.98 चौरस फुट आहे. सर्वेक्षणानुसार दिल्लीत निवासी मालमत्ता दहा लाख रुपयांत 201 वर्गमीटर जमीन खरेदी करू शकता. तर बंगळुरूमध्ये हाच दर 10 लाख रुपयांसाठी 334 वर्गमीटर आहे. 2018 मध्ये जागतिक स्वरूप पाहता निवासी मालमत्तेच्या किमतीत वाढीच्या प्रकरणात मुंबई 0.3 टक्के वाढीबराबेरच 67 व्या स्थानावर आहे. नाइट फ्रॅंकच्या प्रवक्‍त्याच्या मते या यादीत 1.4 टक्के वाढीबरोबरच दिल्ली 55 व्या स्थानावर तर 1.1 टक्‍क्‍याच्या वाढीबरोबरच बंगळुरू 56 व्या स्थानावर आहे. मुंबईच्या तुलनेत या ठिकाणी किमती आटोक्‍यात आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)