कर्नाटकमधील छापासत्रामुळे सत्तारूढ आघाडी संतप्त 

प्राप्तिकर विभागाच्या विरोधातील निदर्शनांमध्ये मुख्यमंत्रीही सहभागी

बंगळूर – कर्नाटकमधील 15 ते 20 ठिकाणी प्राप्तिकर विभागाने गुरूवारी छापे टाकले. त्या छापासत्रामुळे संतप्त झालेल्या राज्यातील सत्तारूढ कॉंग्रेस-जेडीएस आघाडीने निदर्शने केली. त्या निदर्शनांमध्ये मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामीही सहभागी झाले.

करचुकवेगिरीच्या संशयावरून प्राप्तिकर विभागाने बंगळूर, मंड्या आणि इतर काही शहरांत छापे टाकले. ती कारवाई प्रामुख्याने जेडीएसच्या नेत्यांना लक्ष्य करून झाली. त्यामुळे जेडीएसबरोबरच कॉंग्रेसनेही आक्रमक पवित्रा स्वीकारला. सत्ताधारी मित्रपक्षांच्या नेत्यांनी बंगळूरमधील प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा दिल्या.

निदर्शनांवेळी बोलताना कुमारस्वामी म्हणाले, मोदी सरकार प्राप्तिकर विभाग आणि इतर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. कर्नाटकमधील छापासत्र म्हणजे संघराज्यीय व्यवस्थेवरील घाला आहे. केवळ काही विरोधी पक्षांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. कुमारस्वामी यांचे पुत्र आणि पुतण्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचे काम करणाऱ्या नेत्यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आल्याने जेडीएस संपत्त झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)