मोदींच्या विरोधातील याचिकेची जुलै मध्ये चौकशी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरात मधील दंगलींच्या प्रकरणात विशेष तपास पथकाने जी क्‍लीन चीट दिली आहे त्याच्या विरोधात झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्या याचिकेवर जुलै मध्ये सुनावणी घेण्याचे न्यायालयाने मान्य केले आहे. न्या ए. एम खानविलकर यांच्या खंडपीठाने जुलै महिन्यात त्याची तारीख ठेवली आहे.

झाकीया या दंगलीत ठार झालेले माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी आहेत. अहमदाबादच्या गुलमर्ग सोसायटीत दंगलखोरांनी जी जाळपोळ केली त्यात एकूण 68 जण ठार झाले होंते त्यात एहसान जाफरी यांचाहीं समावेश होता. या प्रकरणाची जी एसआयटी चौकशी झाली आहे त्यात नरेंद्र मोदी यांना क्‍लीन चीट देण्यात आली आहे. त्याला झाकिया यांनी गुजरात उच्च न्यायालयातही आव्हान दिले होते पण तेथे त्यांची ही याचिका फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी आता त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

विशेष तपास पथकाने 8 फेब्रुवारी 2012 रोजी आपला अहवाल देऊन मोदी व अन्य संबंधीतांना क्‍लीन चीट दिली होंती व ही फाईल बंद केली होती. झाकीयांनी दाखल केलेल्या आव्हान यचिकेत सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड याही सहयाचिकादार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)