जम्मू-काश्‍मीरात 2014 पासून 838 दहशतवाद्यांचा खातमा

नवी दिल्ली: जम्मू-काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांनी 2014 पासून 838 दहशतवाद्यांचा खातमा केला, अशी माहिती केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत दिली. जम्मू-काश्‍मीर राज्यात पाच वर्षांत दहशतवादाशी संबंधित 1 हजार 213 घटना घडल्या. त्या घटनांत 838 दहशतवादी मारले गेले. त्याशिवाय, 183 नागरिकांना जीव गमवावा लागला, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात एका प्रश्‍नाच्या उत्तरादाखल दिली.

मागील पाच वर्षांत देशाच्या इतर भागांत दहशतवादाशी संबंधित 6 घटना घडल्या. त्यात घटनांवेळी 7 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले, तर 11 नागरिक मृत्युमुखी पडले, असेही अहिर यांनी सांगितले. सुरक्षा दलांकडून मागील काही काळापासून जम्मू-काश्‍मीरात दहशतवाद्यांच्या विरोधात धडक मोहिमा हाती घेतल्या जात आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)