इराकमध्ये टायग्रीस नदीत फेरी बोट उलटून 60 जणांचा मृत्यू 

मोसूल (इराक) – इराकमधील टायग्रीस नदीत फेरी बोट उलटल्याने 60 पेक्षा अधिक लोक बुडून मरण पावल्याचे सांगण्यात आले आहे. मोसूल शहराजवळ ही दुर्घटना घडली. मरण पावलेल्यांमध्ये पोहता न येणाऱ्या महिला आणि मुलाचे प्रमाण अधिक असल्याचे मोसूलचे नागरी संरक्षण अधिकारी हुसम खलिल यांनी सांगितले आहे.
कुर्दिश नववर्ष दिन नवरोज आणि मातृदिन एकाच दिवशी आल्याने ते साजरे करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक पिकनिकसाठी निघाले होते.

फेरीबोटीमध्ये क्षमतेपेक्षा किती तरी अधिक प्रवासी भरल्यामुळे ती उलटल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे मोसूल धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे टायग्रीस नदीला पूर आला होता. त्याबाबत अधिकाऱ्यांनी सावधगिरीची सूचना अगोदरच दिलेली होती. बचाव पथकांनी 12 जणांना वाचवण्यात यश मिळवले आहे. फेरी बोट बुडाली, तेव्हा त्यात 100 पेक्षाही अधिक प्रवासी होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अनेक वर्षांच्या इसिसच्या सत्तेनंतर प्रचंड विध्वंस झालेले इराकमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर मोसूल सुधारण्याच्या अवस्थेत असतानाच ही दुर्घटना घडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)