अहमदाबाद – गुजरात सरकारने विवाह नोंदणीसाठीचे शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच औद्योगिक वापरच्या विजेचे बिलही महागणार आहे. या करवाढीतून राज्याला 287 कोटी रूपयांचे वाढीव उत्पन्न मिळणार आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला त्यात ही करवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. हा अर्थ संकल्प एकूण दोन लाख 3 हजार कोटी रूपयांचा आहे.
हा 572 कोटी शिलकीचा अर्थ संकल्प असून त्यातील 60 टक्के रक्कम विकासावर खर्च केली जाणार आहे. जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर राज्याच्या उत्पन्नात सुमारे चार हजार कोटी रूपयांची तुट आली आहे. या विषयी मात्र अर्थसंकल्पात उल्लेख नाही. पटेल यांनी सादर केलेले हा सातवा अर्थसंकल्प आहे. राज्यातील विविध सेवांसाठीची स्टॅम्प ड्युटीही महागणार आहे. जीएसटीमुळे जी महसुल घट झाली आहे ती केंद्राच्या अनुदानातून भरून निघेल अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.