गुजरातेत राष्ट्रवादी लोकसभेच्या सर्व जागा लढवणार

File photo

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुजरातमधून लोकसभेच्या सर्वच्या सर्व २६ जागांवर निवडणूक लढवली जाणार असल्याचे वृत्त आहे. याबाबत एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेद्वारे वृत्त देण्यात आले असून गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेच्या २६ जागा लढवणार असल्याचे या वृत्तामध्ये सांगण्यात आले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जागावाटपाच्या वाटाघाटींवर एकमत न होऊ शकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरातेत लोकसभेच्या सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र निवडणुका लढवत असून राज्यामध्ये काँग्रेस २६ तर राष्ट्रवादी २२ जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार असून दोन्ही पक्षांकडून मित्रपक्षांची प्रत्येकी २ जागा सोडण्यात येणार आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये जरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करण्यात यशस्वी झाले असले तरी गुजरातेत मात्र वाटाघाटींचे रूपांतर आघाडीमध्ये होऊ शकले नाही.

https://twitter.com/ANI/status/1111230036319920128

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)