#Video : शरद पवारांच्या समोरच राष्ट्रवादीच्या दोन गटात राडा

सातारा : शरद पवार यांच्या माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेली अंतर्गत गटबाजी उघड झाली. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही याचा अनुभव आला. शरद पवार यांच्या भाषणादरम्यानच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जोरदार राडा झाला. हा वाद एवढा टोकाला गेला की, संतप्त कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. गोंधळामुळे शरद पवारांनी भाषण थांबवलं.

माण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारकीच्या स्पर्धेतील शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्यात टोकाचा अंतर्गत वाद आहे. या वादातून कविता म्हेत्रे स्टेजवर बसल्यामुळे शेखर गोरे यांनी स्टेजवर न येण्याचा निर्णय घेत खाली बसले. सर्वांनी त्यांना स्टेजवर येण्यासाठी विनंती केली, मात्र ते स्टेजवर न जाता खालीच बसले.

यानंतर कविता म्हेत्रे यांनी भाषणाला सुरुवात करताच, शेखर गोरे यांच्या समर्थकांनी ‘सर्व सांगा, खरं सांगा’, असं म्हणत गोंधळ घालायला सुरुवात केली. हा वाद इतक्या टोकाला गेला की यात पोलिसांना मध्यस्थी करत सर्वांना खाली बसण्यास विनंती केली. खुद्द शरद पवारांनीही पुढाकार घ्यावा लागला. तरीही कार्यकर्ते ऐकत नसल्याने शरद पवार हताशपणे हा वाद पाहत राहिले.

https://www.facebook.com/edainikprabhat/videos/528493294325146/

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)