आगामी वर्षात शेतीला कर्जपुरवठ्यात वाढ होणार

नवी दिल्ली  – पुढील वर्षीच्या (2019-2020) अर्थसंकल्पात कृषी कर्ज 10 टक्‍क्‍यांनी वाढवून ते 12 लाख कोटी रुपये केले जाऊ शकते. एक फेब्रुवारी रोजी हा अर्थसंकल्प संसदेत सादर केला जाईल. सध्याच्या आर्थिक वर्षात सरकारने या कर्जाचे लक्ष्य 11 लाख कोटी रुपये वाटपाचे ठेवले आहे.

दरवर्षी सरकार कृषी कर्जाचे लक्ष्य वाढत नेत आहे. यंदाही (2019-2020) ते सुमारे 10 टक्‍क्‍यांनी (एक लाख कोटी रुपये) वाढवून 12 लाख कोटी रुपये केले जाण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांना संस्थांमार्फत कर्ज उपलब्ध झाल्यास त्यांना खासगी मार्गांनी कर्ज घ्यायची वेळ येत नाही. खासगी कर्जाच्या व्याजाचा दर हा त्यांचे आर्थिक शोषण करणारा असतो, असे या सूत्रांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सामान्यत: कृषी कर्जाच्या व्याजाचा दर हा नऊ टक्के असतो. तथापि, कृषी उत्पादन वाढण्यासाठी सरकार परवडणाऱ्या दराने अल्पमुदतीचे कर्ज उपलब्ध होण्यास व्याज साह्य उपलब्ध करून देते. कृषीसाठीच्या कर्जात प्रत्येक आर्थिक वर्षाचे जे लक्ष्य ठरवलेले असते त्यापेक्षा जास्त दिले जाते. उदा. 2017-2018 वर्षाचे लक्ष्य 10 लाख कोटी रुपयांचे ठरवले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)