विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी कंटेनरचालकावर गुन्हा दाखल

वाकी: महळुंगे इंगळे (ता. खेड) येथे अवजड कंटेनरची दुचाकीला ठोस बसून झालेल्या अपघातात विवाहितेचा रविवारी (दि. 5) मृत्यू झाला होता. तर पती गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, या अपघाताला करणीभूत ठरणाऱ्या अज्ञात कंटेनरचालकावर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रियांका सागर मांडेकर (वय 22, रा. आंबेठाण, ता. खेड) असे मृत झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
तर सागर मांडेकर (वय 27, रा. आंबेठाण) हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती अशी की, चाकण – तळेगाव दाभाडे रस्त्यावरून रविवारी (दि. 5) रात्री नऊच्या सुमारास तळेगाव दाभाडे बाजूकडून भरधाव कंटेनर चाकण बाजूकडे निघाला होता. त्यावेळी महाळुंगे इंगळे गावच्या हद्दीतील इंद्रप्रस्थ हॉटेलसमोर कंटेनरची पुढील दुचाकीस जोराची ठोस बसल्याने दुचाकीवरील प्रियांका मांडेकर यांचा जागीच मृत्यू झाला तर सागर मांडेकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर चाकण येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. या अपघातानंतर अज्ञात कंटेनरचालक कंटेनर घेवून तसाच पुढे निघून गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)