युती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही

  • दक्षिण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे द्या
  • नगर दक्षिण शिवसेनेची ठाकरेंकडे मागणी

नगर: आजवरच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना प्रामाणिकपणे काम करीत असल्याने खा. दिलीप गांधी हे निवडून आले. परंतू खा. गांधी यांनी शिवसेनेने सुचविल्याप्रमाणे एकही काम केले नाही. उलट त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम केले आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती होवून खा. गांधी यांना भाजपची उमेदवारी मिळाली तर शिवसैनिक काम करणार नाही. खा. गांधी यांच्या विषयी मतदारसंघात नाराजी असल्याने त्याचा पराभव अटळ आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेकडे द्यावा अशी मागणी नगर दक्षिण शिवसेनेच्यावतीने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्यासह तालुकाप्रमुख व अन्य पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, हा मतदारसंघ शिवसेनेला मानणारा आहे. सन 1998 पर्यंत शिवसेनेकडे हा मतदारसंघ होता. स्व. बाळासाहेब विखे या मतदारसंघातून पक्षाचे खासदार झाले होते. त्यानंतर हा मतदारसंघ भाजपकडे गेला. खा. गांधी हे खासदार झाले. अर्थात शिवसेनेने प्रामाणिक काम केल्याने ते खासदार झाले आहे. परंतू ते आता शिवसेनेने सुचविलेली कामे करीत नाही. उलट पक्षाला त्रास देण्याचे काम करीत आहे. या मतदारसंघात पक्षाचा सध्या एक आमदार आहे. नगर शहरात अनिल राठोड हे 25 वर्ष आमदार होते. गेल्यावेळी थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला. त्याची सल नगरकरांच्या मनात आहे.

महापालिका निवडणुकीत 24 नगरसेवक निवडून आले आहे. त्या निवडणुकीत 1 लाख 93 हजार मते शिवसेनेला मिळाली आहे. अन्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ पक्षाला अनुकूल आहे. खा. गांधी यांनी नेहमीच शिवसेना विरोधी भूमिका घेवून पक्षाला त्रास दिला आहे. त्यामुळे खा. गांधींवर शिवसैनिक नाराज आहेत. युती होवून खा. गांधी यांना उमेदवारी देण्यात आली तर त्याचे काम शिवसैनिक करणार नाहीत. खा.गांधी यांच्या उमेदवारीला भाजपमधुनही विरोध आहे. त्यामुळे खा. गांधी याचा पराभव अटळ आहे. याचा विचार करून हा मतदारसंघ शिवसेनेकडे द्यावा.शिवसैनिक जीवाचे रान करून उमेदवार निवडून आणली. असा दावा या निवेदनात करण्यात आला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)