नितीश कुमारांवर चप्पल फेकणाऱ्या विद्यार्थ्यांला कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण

नवी दिल्ली – पाटणा येथील एका शालेय कार्यक्रमादरम्यान आरक्षणाच्या मुद्यावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर विद्यार्थ्यांनं चप्पल भिरकावली आहे. या घटनेनंतर पाटणा पोलिसांनी चप्पल फेकणाऱ्या विद्यार्थ्यांला ताब्यात घेतले आहे.

पाटण्यातील गांधी मैदानावरील एका कार्यक्रमात नितीश कुमार हे विद्यार्थ्यांना संबोधित करणा होते. याचदरम्यान एका विद्यार्थ्याने आरक्षणच्या मुद्यावरून नितीश कुमार याच्यांवर चप्पल फेकली. यावेळी व्यासपीठावर अनेक नेते उपस्थित होते. ही चप्पल नितीश कुमारांच्या व्यासपीठावर जाऊन पडली.

चप्पल फेकणाऱ्या विद्यार्थ्यांच नाव चंदन आहे. ही घटना घडताच उपस्थित जनता दल युनायटेडच्या कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहण केली. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत त्या विद्यार्थ्यांला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी चालू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)