अयोध्येत वादग्रस्त ठिकाणी बुद्धमूर्तीची स्थापना करावी 

– भाजप खासदाराची मागणी

गोंडा, (उत्तर प्रदेश)- अयोध्येत वादग्रस्त भूमीवर राम मंदिर उभारणीच्या कामाला त्वरित सुरुवात करण्याची मागणी वाढत असतानाच त्या जागेवर बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्याच एका खासदाराने केली आहे. बहारिच येथील भाजपचे खासदार सावित्रीबाई फुले यांनी ही मागणी केली आहे. त्यामुळे या विषयाला आता वेगळे वळण लागण्याची चिन्हे आहेत.

-Ads-

“उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार वादग्रस्त भूमीवर उत्खनन करण्यात आले आहे. तेथे भगवान बुद्धाशी संबंधित वस्तू आढळून आल्या आहेत. म्हणून या जागेवर बुद्धमूर्ती बसवण्यात यावी.’ असे फुले यांनी म्हटले आहे.
भारत हा बुद्धाचा देश आहे. त्यामुळे अयोध्याही बुद्धाचेच ठिकाण आहे. म्हणून बुद्धमूर्तीच तेथे प्रस्थापित करण्यात यायला हवी, अशी मागणी सावित्रीबाई फुले यांनी केली आहे.

अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी राज्यसभेतील भाजपचे खासदार राकेश सिन्हा यांनी खासगी विधेयक आणण्याची तयारी केली आहे. त्यावर फुले यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली होती. राज्यघटनेनुसार भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. सर्व धर्मियांना समान सुरक्षितता देण्याची हमी आहे. देशाचा कारभार राज्यघटनेनुसार चालायला हवा, असेही फुले म्हनाल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
26 :thumbsup: Thumbs up
26 :heart: Love
2 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)