औरंगाबादमध्ये पित्याकडूनच दोन्ही मुलांची हत्या

औरंगाबाद – औरंगाबादमधील एका विहिरीत मृतावस्थेत आढळलेल्या दोन चिमुरड्यांच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पत्नीशी झालेल्या वादानंतर पतीनेच पोटच्या मुलांचा जीव घेतल्याचे समोर आले आहे.

संतोष वाळूंजे असे संशयित आरोपीचे नाव आहे. औरंगाबादेतील सावखेडगंगा शिवारातील विहिरीत दोन दिवसांपूर्वी दोन मुले मृतावस्थेत आढळली होती. बायकोशी झालेले भांडण आणि दोन मुलांना खाऊ घालण्याच्या विवंचनेतून पित्यानेच आपल्या दोन मुलांची हत्या केल्याचा आरोप आहे.

संतोष आणि पत्नीचे सतत वाद होत असल्यामुळे त्याने दोन मुलांना घेऊन घर सोडले होते. अशात दोन्ही मुले भूकेने व्याकूळ झाली होती. मात्र संतोषच्या खिशात पैसे नसल्याने तो त्यांना खाण्यासाठी काहीही घेऊ शकला नाही. अखेर, संतोषने गणेश आणि कृष्णा या दोघा मुलांना थेट विहिरीत ढकलून देऊन त्यांची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास करण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)