भारतात सगळेच सुरक्षित; नकवींनी पाकिस्तानी पंतप्रधानांना फटकारले

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी आज पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना त्यांच्या भारतामधील अल्पसंख्याकांबाबत केलेल्या विधानावरून खडे बोल सुनावले आहेत. नकवी यांनी इम्रान खान यांना प्रतिउत्तर देताना, “इम्रान खान यांनी पाकिस्तानातल्या जनतेच्या सुरक्षिततेची काळजी करावी, भारतामध्ये सर्वच भारतीय सुरक्षित आहेत.” असे ठासून सांगितले.

तत्पूर्वी, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका आठवड्याच्या कालावधीमध्ये दुसऱ्यांदा भारतातील अल्पसंख्यांकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करताना, “नवा पाकिस्तान हा जिन्हांचा पाकिस्तान असून आमच्याकडे अल्पसंख्यांकांना देखील समान वागणूक दिली जाते, मात्र भारतामध्ये अशी परिस्थिती नाही.” असे वक्तव्य केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खान यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना नकवी यांनी आज, “ज्या देशामध्ये लोकशाही नाही, धर्मनिरपेक्षता नाही, कट्टर शक्तींचा सरकार मध्ये मोठा हस्तक्षेप आहे, अशा देशातील अल्पसंख्यांक सुरक्षित आहेत असं म्हणणं म्हणजे एक मोठा विनोद आहे.” असे वक्तव्य केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)