इम्रान खान यांचा चर्चेवरून भारतविरोधी कांगावा

इस्लामाबाद: पाकिस्ताने पंतप्रधान इम्रान खान यांनी चर्चेवरून भारतविरोधी कांगावा केला. मी भारताला शांतता चर्चेचा प्रस्ताव दिला. मात्र, त्या देशाकडून प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोप इम्रान यांनी केला.

तुर्किश वृत्तसंस्थेला मुलाखत देताना इम्रान यांनी भारताशी चर्चा करण्याची पाकिस्तानची इच्छा असल्याचे म्हटले. भारत आणि पाकिस्तान हे अण्वस्त्रसज्ज देश आहेत. दोन्ही देशांनी युद्धाचा साधा विचारही करू नये. युद्ध दोन्ही देशांसाठी आत्मघाती ठरेल. शीतयुद्धही दोन्ही देशांच्या हिताचे नाही, असे ते मुलाखतीवेळी म्हणाले.

भारताने एक पाऊल उचलले तर आम्ही दोन पाऊले उचलू. मात्र, पाकिस्तानने दिलेले चर्चेचे प्रस्ताव भारताने अनेकदा फेटाळले, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. काश्‍मीरवर वक्रदृष्टी ठेवणाऱ्या पाकिस्तानकडून नेहमी तेथील जनतेविषयी नक्राश्रू ढाळले जातात. त्याचा प्रत्यंतर देत इम्रान यांनी काश्‍मिरी जनतेचे हक्क भारत कधीच दडपू शकणार नाही, असे म्हटले.

दहशतवादाला पाठिंबा देण्याचे पाकिस्तानने थांबवलेले नाही. त्यामुळे त्या देशाशी चर्चा न करण्याचे रास्त धोरण भारताने अवलंबले आहे. एकाचवेळी दहशतवाद आणि चर्चा घडू शकत नाही, अशी ठाम भूमिका भारताने घेतली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)