जबरदस्तीच्या धर्मांतरांची चौकशीचे इम्रान खान यांचे आदेश

इस्लामाबाद – पाकिस्तानातील सिंध प्रांतात दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिले आहेत. या दोन्ही मुलींचा ताबडतोब शोध लावला पाहिजे, असेही खान यांनी प्रशासनाला सांगितल्याचे महिती मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितले.

होळीच्या दिवशी रवीना (13 वर्षे ) आणि रीना (15 वर्षे) या मुलींचे घोतकी जिल्ह्यातल्या काही प्रभावशाली गटाने अपहरण केले होते. या अपहरणाच्या घटनेनंतर लगेचच एक धर्मगुरु या दोन्ही मुलींचा निकाह लावत असल्याचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता. तर एका अन्य व्हिडीओमध्ये या अल्पवयीन मुली “आम्ही स्वतःच्या मर्जीने इस्लाम धर्म स्वीकारला आहे.’ असे म्हणताना आढळल्या. त्यामुळे देशभर संतापाचा लाट निर्माण झाली होती.

या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पंतप्रधान इम्रान खान यांनी सिंध प्रांताच्या मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाचा अहवाल ताबडतोब मागितला आहे. असे प्रकार पुन्हा घडता कामा नयेत, यासाठी प्रभावी उपाय योजन करण्यात याव्यात, असेही पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले असल्याचे फवाद खान यांनी उर्दूमध्ये केलेल्या ट्विटमध्ये सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)