ईईएफमध्ये भाग घेण्यासाठी इम्रान खान रशियाला भेट देणार

इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान इस्टर्न इकॉनॉमिक फोरम (ईईएफ) येथे उपस्थित राहण्यासाठी सप्टेंबरमध्ये रशियाला रवाना होतील.

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या निमंत्रणाला खानने गेल्या महिन्यात मान्यता दिली होती. बिश्‍केकमधील शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) च्या दरम्यान याविषयी निर्णय घेण्यात आला होता. ईईएफचे अधिवेशन व्लादिवोस्तोकमध्ये 4 ते 6 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी याविषयी माहिती दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

व्लादिवोस्तोकमधील ईईएफमध्ये मुख्य अतिथी म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले आहे आणि त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे. रशियाद्वारे अंमलात आणण्यात येत असलेले ईईएफ अधिवेशन हे जागतिक अर्थव्यवस्था, प्रादेशिक एकत्रीकरण आणि विकास या विषयांवरील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून कार्य करते. हे व्यासपीठ रशियाच्या अतीपूर्वेकडील परकीय गुंतवणूकीला प्रोत्साहित करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)