…तर भारताला चोख उत्तर देऊ, इम्रान खान यांची धमकी

इस्लामाबाद: पाकिस्तानवर हल्ला केल्यास चोख उत्तर देऊ,अशी धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला दिली आहे. तसेच पाकिस्तान भारतावर हल्ला का करेल ? भारताने पुलवामा हल्ल्याबाबत काही पुरावे दिल्यास आम्ही चौकशीसाठी तयारअसल्याचे इम्रान खान यांनी स्पष्ट केले. पुलवामा हल्ल्यानंतर इम्रान खान यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले.

पाकिस्तानला भारताने आतापर्यंत अनेक पुरावे दिले मात्र पाकिस्तानने नेहमी आरोप फेटाळले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इम्रान खान म्हणाले, पाकिस्तानवर भारताने हल्ला केल्यास, पाकिस्तान गप्प बसणार नाही. पाकिस्तानकडून भारताला चोख उत्तर देऊ, आम्ही युद्ध करण्याच्या बाजूने नाही कारण युद्ध करणे सोपं आहे आणि थांबवणे कठीण आहे, दोन देशांमधी वाद केवळ चर्चेतून सुटेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)