इम्रान खान यांनी लावली आपल्या खर्चाला कात्री

इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यासाठी त्यांनी त्यांच्या खर्चालाही कात्री लावण्यास सुरूवात केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान 21 जुलैपासून तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांनी त्यांच्या या भेटी दरम्यान आलिशान हॉटेल ऐवजी वॉशिंग्टनमधील देशाच्या राजदूताच्या अधिकृत निवासस्थानात राहण्याचा निर्णय घेतला आहे. राजदूत असद मजीद खान यांच्या निवासस्थानी राहण्याने प्रवासाचा खर्च कमी होऊ शकतो. डॉन न्यूजच्या रिपोर्टनुसार इम्रान यांच्या या निर्णयाबाबत अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने आणि शहराच्या प्रशासनानेही कोणतीच गंभीर दखल घेतलेली नाही.

यूएस गुप्तचर विभाग अमेरिकेत येणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या सुरक्षिततेची जबाबदारी ते देशात असेपर्यंत स्वीकारते. शहर प्रशासनाला देखील हे सुनिश्‍चित करावे लागते की या दौऱ्यामुळे वॉशिंग्टनच्या वाहतुकीत व्यत्यय येऊ नये. वॉशिंग्टनमध्ये दरवर्षी शेकडो राष्ट्रपती आणि पंतप्रधान येतात आणि अमेरिका सरकार शहराच्या प्रशासनाच्या सहकार्याने काम करते आणि जे प्रतिष्ठित व्यक्ती देशात येतात त्यांच्यामुळे राजधानीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)