इम्रान खान यांच्या शपथविधीला आंतरराष्ट्रीय नेत्यांना निमंत्रण नाहीच

पाक परराष्ट्र कार्यालयाची माहिती

इस्लामाबाद – पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआई) पक्षाचे प्रमुख इम्रान खान ११ ऑगस्ट रोजी शपथ घेणार आहेत. या शपथविधी दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सार्कच्या नेत्यांना निमंत्रण दिले जाण्याच्या चर्चा माध्यमांमध्ये सुरु होत्या. मात्र कोणत्याही आंतरराष्ट्रीय नेत्याला इम्रान खान यांच्या शपथविधीचे निमंत्रण दिले जाणार नसल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने आज स्पष्ट केले. यामुळे सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

-Ads-

क्रिकेटर-राजकारणी इम्रान खान यांचा पक्ष तेहरीक-ए-इन्साफ हा पाकिस्तानमधल्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून सिद्ध झाला आहे. ११ ऑगस्ट रोजी इम्रान खान यांचा शपथविधी असून यासाठी भारतीय माजी क्रिकेट खेळाडू कपिल देव, सुनिल गावस्कर, नवजोत सिंह सिध्दू आणि बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांना निमंत्रित केले आहे. तर  नवजोत सिंह सिध्दू यांनी निमंत्रण स्वीकारले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)