‘इम्रान खान इतके उदार आहेत तर मसूद अझहरला भारताच्या ताब्यात द्यावे’

नवी दिल्ली – दहशतवादाच्या मुद्द्यावरून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही, असे सुषमा स्वराज यांनी म्हंटले आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही निशाणा साधला. जर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान इतकेच उदार आहेत तर मग त्यांनी मसूद अझहरला आमच्या ताब्यात द्यावे. इम्रान खान यांनी ही उदारता दाखवावी, अशा शब्दात सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावले.

सुषमा स्वराज यांनी म्हंटले कि, पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मदला केवळ देशात स्थान दिले नाही, तर त्यांना पैसाही पुरवला आहे. ज्यावेळी भारताकडून ‘जैश’वर कारवाई केली जाते, त्यावेळी दहशवादी भारतीय सीमांवर हल्ला करतात. एकीकडे मसूद अजहर आजारी असून घराबाहेर पडू शकत नाही, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री म्हणतात. तर दुसरीकडे मसूद अजहर पाकिस्तानात नसल्याचे पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी सांगतात. यावरून पाकिस्तानचा खोटारडेपणा समोर येतो, असेही त्यांनी सांगितले.

-Ads-

दरम्यान, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रलंबित मागणीला चीनने पुन्हा एकदा विरोध केला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)