इम्रान खान यांच्यावर विदेश मंत्रालयाची आगपाखड

नवी दिल्ली : भारतातील अल्पसंख्यांकांबाबत वक्‍तव्य केल्यामुळे विदेश मंत्रालयाने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जोरदार आगपाखड केली आहे. इम्रान खान यांनी भारतातील अल्पसंख्यांकांबाबत केलेले वक्‍तव्य भयंकर असून भारतातील नागरिकांचा अवमान करणारे आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पुन्हा एकदा भारताच्या धर्मनिरपेक्ष धोरणाबाबतचे अज्ञान दाखवून दिले आहे. असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

देशातील घटनात्मक सर्वोच्च पदांवर आणि सरकारमधील अधिकृत पदांवर अल्पसंख्य नागरीक नियुक्‍त आहेत. मात्र त्याच्याविरोधात पाकिस्तानमध्ये बिगरमुस्लिम नेत्यांना घटनात्मक पदांवरील नियुक्‍ती नाकारली जाते. पाकिस्तानमधील आर्थिक सल्लागार परिषदेसारख्या सरकारी संस्थेमध्ये बिगर मुस्लिमांना नियुक्‍त केले जात नाही, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

पाकिस्तानने आपल्या देशांतर्गत प्रश्‍नांवर लक्ष केंद्रीत करावे आणि आपल्या नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करावा. देशांतर्गत समस्यांवरून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करू नये, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी “भारतातील अल्पसंख्यांकांना जशी वागणूक मिळते, तशीच पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांना दिली जाईल, असे वक्‍तव्य केले होते. भारतातील मुस्लिमांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळते, असा आरोपही खान यांनी केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)