एससीओ बैठकीत इम्रान खान यांनी मोडला प्रोटोकॉल

बिश्‍केक: किर्गिजस्तानची राजधानी बिश्‍केकमध्ये एससीओची बैठकीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शिखर बैठकीचे राजकीय प्रोटोकॉल मोडल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. गुरूवारी बिश्‍केकमध्ये एससीओ शिखर बैठकीचा शुभारंभ सोहळा आयोजित केला होता. यावेळी हॉलमध्ये जेव्हा एससीओ सदस्य देशांचे प्रमुख एक-एक करून हॉलमध्ये प्रवेश करत होते. तेव्हा हॉलमध्ये उपस्थित असलेले त्यांच्या सन्मानासाठी आपल्या जागेवर उभे राहून त्यांचे स्वागत करत होते. मात्र यावेळी हॉलमध्ये उपस्थित असलेले इम्रान खान आपल्या जागेवरच बसून असल्याचे दिसत आहे.

जेव्हा इम्रान खान यांना त्याची जाणीव झाली की, केवळ आपण एकटेच हॉलमध्ये बसून आहोत तेव्हा ते तात्काळ उभे राहिले. मात्र त्यानंतरही सर्व नेते आपल्या जागेवर बसण्या आधीच इमरान खान आपल्या जागेवर बसले. इम्रान खान यांचा हा उठक बैठकीचा व्हिडिओ व्हायरल होत असुन त्यावर टिका होताना दिसुन येत आहे.

इम्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय बैठकीत प्रोटोकॉल मोडण्याची त्यांची ही पहिलीच वेळ नाही आहे. याआधी ही काही महिन्यांपूर्वी सौदी अरेबियामध्ये आयोजित 14 व्या ओआईसी परिषदेत ते प्रोटोकॉल मोडताना दिसले. इम्रान खान येथे सौदीचे राजा सलमान बिन अब्दुलाजीज यांच्यासोबत चर्चा करत होते. येथे सौदीचे राजा यांचा अनुवादक पंतप्रधान इम्रान खान यांचं संभाषण ट्रान्सलेट करत होता. यावेळी त्यांचे भाषांतर संपण्याआधीच इम्रान खान तिथून निघून गेले. या वाक्‍यांचा देखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)