पाकिस्तान दिनानिमीत्त खुद्द मोदींनीच दिल्या इम्रानखान यांना शुभेच्छा

एकत्र काम करण्याची केली इच्छा व्यक्त

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमीत्त काल दिल्लीत पाकिस्तानी उच्चायुक्तांकडून आयोजित करण्यात आलेल्या सरकारी कार्यक्रमावर भारत सरकारने अधिकृतपणे बहिष्कार घातला असला तरी खुद्द पंतप्रधान मोदींनी मात्र पाकिस्तानच्या पंतप्रधानांना संदेश पाठवून या दिनानिमीत्त शुभेच्छा दिल्या आहेत. स्वता इम्रान खान यांनीच ट्‌विटवर ही माहिती दिली आहे.

इम्रान खान यांना पाठवलेल्या संदेशात मोदींनी म्हटले आहे की या राष्ट्रीय दिनानिमीत्त आपल्या देशातील जनतेला माझ्या शुभेच्छा, हिंसाचार आणि दहशत मुक्त वातावरणासाठी तसेच लोकशाही, शांतता, समृद्धी आणि विकासासाठी आपल्या प्रदेशातील सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. मोदींच्या या शुभेच्छा संदेशाबद्दल इम्रान खान यांनी त्यांचे आभारही मानले आहेत.

दिल्लीत काल पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयाने पाक राष्ट्रीय दिनानिमीत्त जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला त्यांनी काश्‍मीरातील हुर्रियत नेत्यांनाही निमंत्रण दिल्याचे कारण देत भारत सरकारने या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. कालच्या या कार्यक्रमाच्यावेळी भारत सरकारचे काही अधिकारी उच्चायुक्त कार्यालयाच्या बाहेर उपस्थित राहुून या कार्यक्रमाला येणाऱ्यांना तेथे जाण्यापासून परावृत्त करीत होते असे वृत्त एका वाहिनीने दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)