इमरान हाश्‍मीची मोठ्या पडद्यावर वापसी

बॉलीवूडमधील अभिनेता इमरान हाश्‍मी दिर्घ काळानंतर मोठ्या पडद्यावर वापसी करत आहे. इमरान हाश्‍मीचा आगामी चित्रपट “चीट इंडिया’चा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. हा चित्रपट इमरान हाश्‍मीच्या होम प्रॉडक्‍शनच्या पहिला चित्रपट असून देशांतील शिक्षण व्यवस्थेच्या प्रश्नांवर भाष्य करणारा आहे.

चीट इंडिया चित्रपटात इमरान हा राकेश सिंहची भूमिका साकारत आहे. राकेश सिंह श्रीमंत मुलांकडून पैसे घेऊन त्यांच्या जागी हुशार विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवत असतो. इमरान हाश्‍मीच्या दुसऱ्या चित्रपटांसारखे या चित्रपटातही अनेक दमदार डायलॉग्ज आहेत. “मुझे हीरो बनने की बिलकुल इच्छा नहीं है, विलेन बनने का टाइम नहीं है, खिलाड़ी हूं बस खेल रहा हूं.’

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या चित्रपटातून अभिनेत्री श्रेया धनवंतरी बॉलीवूडमध्ये डेब्यू करत आहे. देशांतील शिक्षणाच्या मुद्दयांवर आधारित हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होतो आहे. चित्रपटाची निर्मिती टी-सीरिज, अतुल कासबेकर व तनुज गर्गच्या एलिप्सिस एण्टरटेन्मेंट आणि इमरान हाश्‍मीने केली आहे. तर सौमिक सेन यांनी दिग्दर्शित केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)