बालाकोट मोहिमेत ‘लोहगाव’ची महत्त्वाची भूमिका

पुणे – “युद्धजन्य परिस्थितीत यश मिळविण्यासाठी चांगले प्रशिक्षण महत्त्वाचे. त्यामुळेच लोहगाव केंद्रासारख्या प्रशिक्षण संस्था महत्त्वपूर्ण ठरतात. बालाकोट हल्ल्यानंतर देशातील हवाईदलाची केंद्रांना सज्ज राहण्यास सांगितले होते. यावेळी लोहगाव हवाईदलाचे केंद्राची भूमिका महत्त्वपूर्ण होती. यापुढील काळातही अशीच सज्जता बाळगणे आवश्‍यक आहे,’ असे प्रतिपादन हवाई दलाच्या दक्षिण-पश्‍चिम (नैऋत्य) मुख्यालयाचे प्रमुख एअरमार्शल एच. एस. अरोरा यांनी केले.

लष्कराच्या दक्षिण मुख्यालय प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांची अरोरा यांनी बुधवारी भेट घेतली. यावेळी मुख्यालय प्रमुखांनी दोन्ही दलातील परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना आणि विविध मोहिमांबाबतची चर्चा केली. एअरमार्शल अरोरा यांनी बुधवारी लोहगाव येथील हवाई दलाच्या केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी हवाईदलाची युद्ध तत्पतरता आणि व्यवस्थापनविषयक कार्याचा आढावा घेतला. तसेच हवाईदलाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी एअर मार्शल अरोरा यांच्या पत्नी आणि एअरफोर्स वाइव्ह वेल्फेअर असोसिएशन (प्रादेशिक)च्या अध्यक्ष बलजीत अरोरा उपस्थित होत्या. हवाई केंद्राचे प्रमुख एअर कमोडोर राहुल भसिन आणि विंग कमांडर नीरज भसिन यांनी त्यांचे स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)