शेतकऱ्यांसाठी 500 रूपये किती महत्वाचे, हे एसी रूममध्ये बसणाऱ्यांना काय कळणार -पियुष गोयल

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेले पियूष गोयल यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मोदी सरकारने लहान शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत दरवर्षी 2 हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 6 हजार रूपये मिळतील. या योजनेची अंमलबजावणी 1 मार्च 2019 पासून होईल, असं गोयल यांनी सांगितले.

आजच्या अर्थसंकल्पानंतर एएनआय या वृतसंस्थेला मुलाखात देताना गोयल यांनी या योजनेंबदल सविस्तर माहिती देत महत्व सांगितलं. शेतकरी वर्गासाठी 500 रूपये ही रक्कम किती महत्वाची असते, ते एसी रूममध्ये बसणाऱ्यांना कळणार नाही, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर शेतकऱ्यांकडे खर्चासाठी एक रूपयाही जवळ नसतो. अशावेळी अनेक महत्वांच्या कामासाठी हे पैसे कामी येतील. ही रक्कम म्हणजे अनुदान नव्हे तर आपल्या अन्नदात्याचा सन्मान म्हणून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली असल्याचं पियुष गोयल यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)